
रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती
रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती.
यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी युवा निर्भीड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक संजय जहुरे यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत सध्या राज्यात शेतकरी हिताच्या कार्यात अग्रेसर असणारी रयत शेतकरी संघटनेच्या रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड संघटनेचे अध्यक्ष ऍड.रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.सुनील देवरे,उपाध्यक्ष शुभम तायडे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.पत्रकार विनायक जहुरे यांना त्यांच्या सहीचे नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.निवड झालेल्या जहुरे यांनी मी आल्यापासून तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्याचं तसेच संघटना मजबूत व बळकट बनविण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे संवाद साधताना सांगितले.
दरम्यान त्यांच्या निवडीबद्दल म.रा.पत्रकार रावेर संघांचे ता.अध्यक्ष विलास ताठे,जिल्हा प्र.प्रमुख विनोद कोळी,काँग्रेस ता.सरचिटणीस महेश लोखंडे,वंचित आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग,प्रदीप महाराज,प्रमोद कोंडे,अतुल धंजे सर,भिमराव कोचूरे,सुमित पाटील,प्रभाकर महाजन,राजेंद्र अटकाळे,व सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.