डॉ प्रमोद देवरे यांची बाटु विद्यापठात सहयोगी अधिष्ठाता पदी नियुक्ती

Featured धुळे
Share This:

डॉ प्रमोद देवरे यांची बाटु विद्यापठात सहयोगी अधिष्ठाता पदी नियुक्ती

शिरपूर  (तेज समाचार प्रतिनिधि):  येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद जगन देवरे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या सहयोगी अधिष्ठाता (असोसिएट डीन, अँकेडेमिक्स) पदी नियुक्ती झाली असल्याचे महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ.प्रशांत महाजन यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र व आर्किटेक्चर या शाखांसाठी स्वतंत्र असे संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. २०१७ पासून विद्यापीठाने आपले कार्य सुरू केले असून आज तागायत राज्यातील सुमारे २०० च्या वर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांनी या विद्यपीठाची संलग्नता घेतलेली आहे. या विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. व्ही आर शास्त्री यांनी शिरपूर येथील आर सी पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी चे उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे यांची सहयोगी अधिष्ठाता म्हणून दोन वर्षांच्या कालावधी साठी नियुक्ती केली आहे.

 

डॉ देवरे यांनी या पूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष म्हणुन यशस्वी रित्या काम केले असून सध्या ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. देवरे हे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच बाटू विद्यापीठात पीएच.डी. साठी मार्गदर्शक असून आत्तापर्यंत ३ प्राध्यापकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे व ५ विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील विविध विषयावर डॉ. देवरे यांची ९ पुस्तके प्रकाशित झालेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये ५० तर राष्ट्रिय स्तरवरील जर्नल्स मध्ये ०६ शोध निबंधही प्रकाशित झालेले आहेत. जानेवारी २०२० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) तर्फे डॉ देवरे यांना ‘इंजीनिअरिंग अचिव्हमेंट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 

डॉ. प्रमोद देवरे यांच्या नियुक्ती बद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष श्री. भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री. राजगोपाल भंडारी, संचालक श्री तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, डॉ. नितीन पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. विजय पाटील, ट्रेनिंग & प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मिल्केश जैन महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ प्रशांत महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांनी अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *