लॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड!

Featured मुंबई
Share This:

 

नवी दिल्ली | गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 8 हजार 380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.  काल लॉकडाऊनच्या शिथील केलेल्या घोषणेनंतर गेल्या 24 तासांतली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ आहे.

गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने विक्रमी भर पडत आहे. दररोज 6 ते 7 हजार रूग्णांची वाढ होत आहे. मात्र गेल्या 24 तासांत 8 हजार 380 विक्रमी रूग्ण आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांतील नवे रुग्ण पकडून देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 1 लाख 82 हजार 143 इतका झाला आहे. आतापर्यंत 5 हजार 164 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरित रुग्णांपैकी 89 हजार 995 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 86 हजार 984 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या असलेलं राज्य आहे.  राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 65 हजार 168 झाली आहे. शनिवारी राज्यात 2 हजार 940 नवीन कोरोनाबाधित आढळले आले.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *