जळगावात अजून एक रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

Featured जळगाव
Share This:
जळगावात अजून एक रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह
जिल्हावासियांनो गांभीर्य लक्षात घेऊन लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करा
जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ): कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर फैलावत असून आज जळगाव जिल्ह्यातील अजून एक रूग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या दोन झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे.  याचाच भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव जिल्ह्यातील नागरिक लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे.
देशातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, येणारे दोन आठवडे अधिक काळजीचे असल्याने जळगाव जिल्हावासियांनी घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. जीवनावश्यक वस्तूचा कुठलाही तुटवडा भासणार नाही.  त्यामुळे त्या घेण्यासाठी गर्दी करू नये.   प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनची साखळी अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *