धुळे जिल्ह्यात आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले

Featured धुळे
Share This:

धुळे जिल्ह्यात आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले

धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे.जिल्ह्यातील आणखी आठ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. साक्री येथील पाच व धुळे शहरातील तीन रूग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल येथील ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच साक्री शहरातील एकता नगर परिसरातील २४, २६ व २८ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच चांदतारा मोहल्ला, साक्री येथील ५ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. धुळे शहरातील काझी प्लॉट येथील २६ वर्षीय महिला, इस्लाम पुरा देवपूर येथील ६३ वर्षीय पुरूष व गजानन कॉलनी परिसरातील २१ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *