
धुळे जिल्ह्यात आणखी 5 करोना पॉझिटिव्ह, रूग्णांची संख्या 204
धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे.आता प्राप्त अहवालानुसार शहरातील हुडको नगर परिसरातील १७ वर्षीय युवक तर साक्री रोडवरील कृषी नगरमधील ४२ वर्षीय महिला, सत्यसाईबाबा कॉलनीमधील ३२ वर्षीय पुरुष दंडेवाला बाबा नगरमधील ५ वर्षीय मुलगा तर शिरपूरमधील अंबिका नगर येथील ३५ वर्षीय पुरुष असे ५ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे डुले जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या २०४ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविदयाल धुळे येथील 49 अहवालांपैकी 03 अहवाल पॉजिटिव्ह
१.३५ वर्ष पुरुष अंबिका नगर शिरपुर
२. ५ महिन्याचा मुलगा प्लॉट नंबर १४८ दण्डेवाले बाबा नगर मोहाडी धुळे
३. ३२ वर्ष पुरुष सत्यसाईबाबा कॉलोनी साक्री रोड धुळे