धुळ्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह आढळले- रुग्णसंख्या 64
धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे जिल्ह्यातील प्राप्त अहवालानुसार दोन जणांना करोनाची लागण झाली आहे. सकाळी आलेल्या अहवालात एक बाधित आढळला होता आताच प्राप्त अहवालानुसार अजून एक बाधित आढळल्यामुळे धुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ६४ वर पोहचली आहे. दरम्यान, काल बुधवारी २६ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला होता. आता जिल्ह्यात रुग्णांची संख्या ६४ झाली असून यात १८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.