जळगाव: रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर

Featured जळगाव
Share This:

रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर

नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकानुसारच धान्य घेण्यास जावे

धान्य घेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव   (तेज समाचार डेस्क) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना तसेच एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शासनाने आधी घोषित केल्याप्रमाणे मे आणि जुन, 2020 चे धान्य   सवलतीच्या दराने मासिक नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या दोन महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.
         कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांच्या ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी मे महिन्यात 1 ते 10 मे, 2020 या कालावधीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वाटप होईल. तर 11 ते 20 मे, 2020 या कालावधीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना नियमित धान्य देणेत येईल, त्याचबरोबर 21 ते 31 मे, 2020 या कालावधीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करणेत येईल. तसेच 21 ते 31 मे, 2020 या कालावधीत राहिलेले एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक, अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजना लाभार्थी यांना त्यांचे नियमित देय आणि मोफतचे धान्य देणेत येईल.
          दिनांक 1 ते  10 मे, 2020 या कालावधीत एपीएल (केशरी) शिधापत्रिका ज्या रास्त भाव दुकानास जोडली आहे, त्या रास्त भाव दुकानातून सदर अन्नधान्य वितरण होईल. या कालावधीत अन्नधान्य न घेतल्यास दि. 21 ते 31 मे, 2020 या कालावधीत शिधापत्रिकाधारकांनी धान्य प्राप्त करून घ्यावे. असेही श्री सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
      एपीएल केशरी शिधापत्रिकाधारका पात्र लाभार्थ्यांची यादी असलेले डी-1 रजिष्टरनुसार शिधापत्रिकेत नमुद सदस्यांकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्य देय राहील. डी-1रजिष्टरला नोंद नसल्यास धान्य मिळणार नाही. अशा कार्डधारकांनी जुने कार्ड तहसिल कार्यालयात जमा करावे. अशा कार्डांची चौकशी करणेत येऊन कडक कारवाई करणेत येईल. या लाभार्थ्यांनी नवीन पुरावे देऊन रिसर नवीन कार्ड काढून घ्यावे. ज्या एपीएल शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल आणि संबंधित शिधापत्रीकाधारकांनी मुळ शिधापत्रीका सादर केल्यास अशा शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिणापत्रिका तपासून विहीत दराने अन्नधान्य देण्यात येईल. अन्नधान्य वाटप करतांना दुकानदाराकडून त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यातील पात्र सदस्यांची संख्या शिधापत्रिकेवरील संपुर्ण तपशिल याची नोंद घेतली जाईल. नोंदवहीमध्ये धान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताचा अंगठयाचा ठसा न घेता शिधापत्रिमेमधील कुटूंबप्रमुखाचा अथवा अन्य सदस्याचा आधार क्रमांक उपलब्ध असल्यास नमुद करावा.
 जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांकडून या योजनेंतर्गत जेवढया लाभार्थ्यांना सवलतीचा लाभ दिला याबाबतचा तपशिल दररोज संकलित करणेत यावा. एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना धान्य दिल्यानंतर त्यांचे शिधापत्रिकेवर धान्य दिल्याची पोहच म्हणून शिधापत्रिकेच्या शेवटच्या पानावर शिक्का मारणेत येईल.              मे आणि जुन मध्ये 8 रुपये प्रति किलो दराने गहू, प्रती सदस्य 3 किलो आणि 12 रुपये प्रति किलो दराने तांदूळ, प्रती सदस्य 2 किलो असे एकूण 5 किलो धान्य प्रति सदस्यास मिळणार आहे. सदरचे धान्य हे मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात संबंधित रास्त भाव दुकानातून उपलब्ध होणार आहे. तसेच माहे जुनमध्ये देखील याचप्रमाणे अन्नधान्य मिळणार आहे.
           एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना धान्य दिल्याबाबत दिलेल्या नमुन्यात स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येईल. तालुक्यात योग्यरितीने एपीएल (केशरी) साठी अन्नधान्याचे वाटप करण्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार तसेच पुरवठा ग्राम दक्षता समिती यांची राहील. जिल्हा प्रशानाकडून शिक्षकांच्या सेवा या कामी घेणेत आल्या असुन शिक्षकांकडे 50 ते 60 कुटूंबांच्या पालकत्वाची जबाबदारी देणेत आली आहे.
           नियुक्त पालक शिक्षक लाभार्थी प्रमाण, धान्याचा प्रकार, देय असलेले धान्य, त्याचा दर, प्रत्येक लाभार्थ्यास तो समाविष्ट असलेल्या योजनेनुसार किती धान्य देय आहे. स्वस्त धान्य दुकान कोठे आहे. दुकानाची वेळ या बाबींची कुटुंबामध्ये जनजागृती करतील. पालक शिक्षक त्यांना नेमुन दिलेल्या लाभार्थ्यांना त्यांना देय असलेले धान्य सुरळीत मिळाले किंवा कसे याबाबतचा अहवाल संबंधीत तलाठी यांना सादर करतील.
            ग्रामस्तरीय दक्षता समिती, सदस्य व पालक शिक्षक लाभार्थ्यांना सोशन डिस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगतील. पात्र लाभार्थी, कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता याकामी नियुक्त सर्व यंत्रणांनी घ्यावयाची आहे. अशाच पध्दतीचे नियोजन माहे जुन 2020 मध्ये देखील करणेत आलेले असून माहे जुन मध्ये देखिल ग्रामस्तरीय दक्षता समिती व पालक शिक्षक पर्यवेक्षण करतील व अहवाल सादर करतील. तहसिल स्तरावर नायब तहसिलदार/अवल कारकून/मंडळ अधिकारी/पुरवठा निरीक्षण अधिकारी/पुरवठा निरिक्षक त्यांना नेमून देणेत आलेल्या रास्त भाव दुकानांची तपासणी करतील. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव सुनिल सुर्यंवशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *