
अंकिता लोखंडेचं रिया चक्रवर्तीला जोरदार प्रत्युत्तर
अंकिता लोखंडेचं रिया चक्रवर्तीला जोरदार प्रत्युत्तर
मुंबई (तेज समाचार डेस्क): रिया चक्रवर्तीने काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडेवर आरोप केले होते. अंकिताने रियाने केलेल्या आरोपांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर अंकिता त्याची विधवा पत्नी बनण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप रिया चक्र्वर्तीने अंकितावर केला होता. याचे उत्तर देत अंकिताने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमधी तिने सहावारी साडी नेसलेली आहे. त्यात ती खुश दिसतं असुन, ‘मुली छोट्या छोट्या गोष्टींवर रडतात. मात्र आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रसंगाला अगदी हसत सामोरे जातात.#powerofwomen’. असं तिने त्या फोटोखाली कॅप्शन लिहिलं आहे.
सुशांत क्लोट्रोफोबिक आहे, असा दावा रियाने यापुर्वी एका मुलाखतीत केला होता. त्यावेळीही रियाच्या आरोपांना उत्तर देत अंकिताने सोशल मीडियावर सुशांतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात व्हिडीओमधी सुशांत क्लोस्ट्रोफोबिकच्या विरोधात वागत होता.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात रोज नवनविन खुलासे होतं आहेतं. सुशांतच्या केसच्या तपासाची जबाबदारी न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली असुन, या केसचा निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.