सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासंयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन !

Featured जळगाव
Share This:

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या
संयुक्त विद्यमाने11भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन !

 

यावल (सुरेश पाटील): राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या आणि आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले अन् आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची स्थापना केली.सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि रामराज्यासारख्या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाचा आहे.या उद्देशाने 23 जुलै2021ला सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.
मराठी,हिंदी,इंग्रजी, गुजराती,कन्नड,तेलुगु,तमिळ, पंजाबी,बंगाली,ओडिया आणि मल्याळम् या11भाषांमध्ये23 जुलैला‘ऑनलाईन’गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.या महोत्सवांत श्रीगुरुपूजन,सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु(डॉ.)जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भाग, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके(बचाव आणि आक्रमण),आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र),तसेच आत्पकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
गुरु म्हणजे काय,गुरुंचे जीवनातील महत्त्व,गुरुकृपा कार्य कशी करते,त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. सध्याच्या महामारीच्या आपत्काळात दैवी बळाची मोठी आवश्यकता आहे.त्यामुळे या महोत्सवात सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेल,तसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईल. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ करून घ्यावा,तसेच आपले मित्र-परिवार,परिचित,नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे,असे आग्रहाचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा 23 जुलैला सायंकाळी7वाजता होणार असून तो ‘यू-ट्यूब’वर पहाता येईल.त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :
1. Youtube.com/SanatanSanstha
2. www.sanatan.org/mr/
सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील ‘लिंक’वर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे – https://www.sanatan.org/mr/gurupurnima अशी माहिती दत्तात्रेय वाघुळदे,
सनातन संस्था,जळगाव
(संपर्क क्रमांक :9284027180) यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *