किनगाव येथे कटर मशिनने पाय कापला गेल्याने एका अविवाहीत अनाथ तरुण कारागीरचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यु.

Featured जळगाव
Share This:

किनगाव येथे कटर मशिनने पाय कापला गेल्याने एका अविवाहीत अनाथ तरुण कारागीरचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यु.

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील किनगाव येथे एक तरूण कटर मशीन काम करीत असतांना अपघात होवुन त्याचा पाय कापला गेल्याने त्यास जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता काही वेळे पुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की सोपान शंकर मिस्त्रि वय ३४ वर्ष राहणार किनगाव तालुका यावल हा तरूण आज दिनांक ३ जुलै रोजी वाजता किनगाव येथे सकाळी काम करीत असतांना त्याचा उज्वा पाय हा कटर मशीनीत आल्याने कापला गेला यावेळी त्यास सर्वप्रथम किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ .मनिषा महाजन यांनी प्रथपोचार करून त्याच्या पायातुन मोठया प्रमाणार रक्तस्त्राव झाल्याने सोपान मिस्त्रि यास पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले असता काही वेळापुर्वीच रूग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत पावल्याचे जाहीर केले आहे . सोपान शंकर मिस्त्रि हा किनगाव येथे चौधरी वाडयात रहीवासी होता त्याची एक कुशल कारागीर व चांगल्या स्वभावामुळे तो गावात सर्वांना परिचित होता , आई वडील यांच्या निधना नंतर तो एकटाच राहात होता, त्यांच्या कुटुंबात एक मोठा असुन तो वेगळा राहात असुन , सोपान यास तिन बहीणी आहेत . त्याच्या अशा मृत्युमुळे गावात आणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *