
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या हुलकावणी वेटर ठार
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि):मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या हुलकावणीत रस्त्याच्या बाजूला फेकला जाधव रक्तबंबाळ शेतीत उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान वेटर ठार झाला.
याबाबत माहिती की.मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या एका खाजगी हॉटेलमध्ये काम करणाऱा वेटर हा सायंकाळच्या वेळी नेहमी प्रमाणे आपले काम आटोपून मौटरसायकल क्रं.एम एच 19 डि एच 8724 ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गाने घराकडे परत येत असताना महामार्गावर अवधान औद्योगिक वसाहतीच्या थोडे पुढे अंतरावर ती रस्त्यावर अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली यावेळी मोटरसायकलवरील ताबा सुटला भरधाव वेगाने मौटरसायकल रस्त्यावरून खाली उतरली व खड्यात आदळली यात दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला जोरदार फेकला गेला यात तो रक्तबंबाळ झाला होता व बेशुद्ध अवस्थेत पडला होता.रिक्षा चालकाने पासुन त्याला नागरीकांच्या मदतीने चक्करबर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु रात्री उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात कळतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यात मृत व्यक्तीची ओळख पटली असून अंकुश बळीराम अहिरे राहणार गोकुळ नगर धुळे याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलिस करीत आहेत.