
भुसावल पोस्ट विभागातील एका अधिकाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण
भुसावल पोस्ट विभागातील एका अधिकाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण
पोस्ट खात्याच्या ग्राहकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट
यावल (तेज समाचार प्रतिनिधि):भुसावळ पोस्ट विभागीय कार्यक्षेत्रातील एका पोस्टमास्टर ला सुद्धा कोरोना विषाणूची बाधा झाल्याने त्या पोस्ट ऑफिस कार्यक्षेत्रात पोस्ट ग्राहकांन मध्ये तसेच खातेदारांना मध्ये आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून पोस्टमास्टर च्या संपर्कात कोण कोण आलेले आहेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अधीक्षक डाकघर भुसावल विभागात प्रत्येक पोस्ट कार्यालयात रिकरींग खातेदारांची, आरडी खाते रक्कम कलेक्शन करणाऱ्या स्त्री-पुरुष एजंट, पोस्ट खात्यात अल्पबचत सर्टिफिकेट घेणाऱ्या आणि सेव्हिंग खातेदार असणाऱ्या स्री- पुरुषांसह शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि पोस्टातून इतर सर्व व्यवहार आणि मनिऑर्डर रजिस्टर करणाऱ्या नागरिकांचा रोजचा मोठा संपर्क येत असतो. यासोबत त्या पोस्ट कार्यालयातील इतर कर्मचारी सुद्धा संपर्कात असतात. अशा परिस्थितीत अधीक्षक डाकघर भुसावल विभागातील एका पोस्ट मास्तरला कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे पोस्ट खात्याच्या ग्राहकांसह त्या संपूर्ण गांवागांवात सर्व स्तरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, याबाबत वैद्यकीय अधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग तात्काळ पुढील कार्यवाही व पर्यायी व्यवस्था करण्याच्या तयारीला लागले आहेत.
आता मात्र संपूर्ण नागरिकांमध्ये घबराटीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कोरना विषाणू संदर्भात सोशल डिस्टन्स आणि प्रत्येकाने आपआपल्या तोंडा नाकावर माक्स लावण्याची अत्यंत आवश्यकता गरज असल्याचे आणि दक्षता बाळगतांना कोणतीही तडजोड करायला नको असे आता नागरिकांमध्ये बोलले जात आहे.