
यावल येथील ज्येष्ठ विवाहित दाम्पत्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या
यावल येथील ज्येष्ठ विवाहित दाम्पत्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या
संपूर्ण यावल शहरावर शोककळा
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): यावल शहरातील एका प्रतिष्ठित व्यापार्याच्या कुटुंबातील विवाहित दाम्पत्याने आज सकाळी सूर्योदय होण्याच्या पूर्वी यावल फैजपूर रोडवर एका विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली तथा आत्महत्या केली, यामुळे संपूर्ण यावल शहरातील व्यापारी वर्गावर,हितचितकांवर मोठी शोककळा पसरली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरासह संपूर्ण तालुक्याला परिचित असलेले पुंजो सेट यांचे लहान भाऊ भागवत ऊर्फ बाळू डिगंबर पाटील वय 61 व त्यांची पत्नी विमलबाई भागवत पाटील वय 57 यांनी आज दिनांक 17 बुधवार रोजी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वीच मॉर्निंग वाकला जातो या कारणाने घरातून निघून यावल फैजपूर रोडवर कला वाणिज्य विज्ञान व महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या निर्मल नथू चोपडे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, विहिरीच्या बाजूला दोघ पती-पत्नीचे चपला व इतर काही वस्तू दिसून आल्याने सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अनेकांना या घटनेची चाहूल लागता बरोबर संपूर्ण यावल शहरात या दुःखद घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले, त्या विहिरीत 40 ते 50 फूट खोल पाण्याची पातळी असल्याने दोघ पती पत्नीचे निधन तात्काळ झाले दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी मोठे शर्तीचे प्रयत्न केले त्यात प्रथम विमलबाई पाटील हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तर भागवत उर्फ बाळू यांचा मृतदेह सकाळी साडेदहा वाजेपर्यंत शोधण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात होते आणि आहे मयत दाम्पत्य हे यावल शहरासह संपूर्ण तालुक्याला परिचित असलेले धान्य व कापूस खरेदी विक्री चे व्यापारी पुंजो सेट डिगंबर पाटील यांचे लहान बंधू आहेत. शारीरिक व्याधीमुळे आजारामुळे कंटाळून पती-पत्नीने आत्महत्या केल्याचे यावल शहरात बोलले जात आहे त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहेत घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे