धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीला धक्का

धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि.) नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ मध्ये भाजपचे अमरीश भाई पटेल यांनी 332 मत मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांच्या समोर उभे असलेले महाविकास आघाडी चे अभिजीत पाटिल यांना मात्र 98 मतांनी समाधान मानवे लगाले आहे. मतगणना करतांना चार मते बाद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा मतमोजणीला निकाल लागला असून भाजपनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणार्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल 234 मतांनी पराभव झाला आहे.
धुळे-नंदुरबारमधून भाजपचे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना 332 मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या 98 मतांवर समाधानं मानावं लागलं आहे. चार मते बाद झाली आहेत. या निवडणुकीत एकूण 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *