
अमरावती : घराच्या वादातून भावाची हत्या
अमरावती : घराच्या वादातून भावाची हत्या
अमरावती (तेजसमचार प्रतिनिधि): अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात मुगलाई पुऱ्यात भावानेच भावाला चाकू मारून ठार केल्याची घटना घडली आहे. घर खाली कर, घरात राहू नकोस म्हणत झालेल्या शाब्दिक वादातून हि घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक आकाश राजू कंगाले याचा भाऊ सागर कंगाले याच्यासोबत घरात राहण्याच्या मुद्यावरून वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सागर व अन्य दोघांनी मृतक आकाशच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. जखमी अवस्थेत आकाशला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून परतवाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परतवाडा पोलिसांनी आरोपीं विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.