चिमठाणे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील एक ठार तर एक गंभीर

Featured धुळे
Share This:

चिमठाणे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील एक ठार तर एक गंभीर

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि):अमळनेर येथील औषध विक्रेते दुकानदाराचा अपघाती मृत्यू. धुळे तालुक्यातील दोंडाईच्या सोनगीर रस्त्यावरती दुपारच्यावेळी येथे औषधे खरेदी करण्यासाठी मोटरसायकलवरून दोंडाईच्या गावात आले होते काही औषध मालाची खरेदी करुन परत नविन ऑर्डर देऊन आपल्या गावी म्हणजेच अमळनेर येथे परत  जाण्याकरिता दुचाकी ने दोघे मित्र परत येत असताना चिमठाणे गावाच्या अलीकडे धुळ्याहून सोनगीर मार्गाने दोंडाईचा कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदारपणे समोर धडक दिली.यात दुचाकी वरील दोन्ही जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले दोन्ही जण रस्त्याच्या बाजूला रक्तबंबाळ स्थितीत तास ते दिड तास पडुन राहिले होते.
नेहमीच अपघात झाला.तर तात्काळ जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करा  असे जाहिरातीतून शाहपण सुचवले जाते.माणसात माणुसकी च राहिली नाही.असा प्रश्न पडतो.या अपघात झाला त्यावेळी हेच चित्र   पाहायला मिळाले याची चर्चा पिएम रुम जवळ चर्चिल गेली.
यात दुचाकीवरील जखमींना काही नागरिकांनी उपचारार्थ रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल केले.यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.त्याचा मृतदेह पासपोर्टसाठी पाठवण्यात आला . पोस्टमार्टम रूम जवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी व नातेवाईकांनी गर्दी केली होती.दुसऱ्या तरुणाची प्रकृती नाजुक आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृत झालेल्या तरुणाची ओळख पटली आहे.तो अमळनेर येथील राहणार आहे.त्याचे नाव रमीझ फारुख शेख ,वय 27 आहे.अमळनेर गावात तरुणाची निधन वार्ता कळताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताबाबत दोंडाईच्या पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *