अमळनेर : प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले

Featured जळगाव
Share This:

अमळनेर : प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले

अमळनेर (तेज समाचार प्रतिनिधि ) : येथील कोरोना (कोविड -१९)या प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोना आजाराचा हॉट स्पॉट ठरलेल्या अमळनेर मध्ये नुकतेच शासनाने सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निरामय सेवा संस्था,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा,जी.एम.फाऊंडेशनकडून ५० पीपीई किट आज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांना सुपूर्द करण्यात आले. तसेच खाजगी व्यवसायिकांना सुद्धा 35 किट चे वाटप करण्यात आले
यावेळी  माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख,कवी कासार भा ज पचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहाराध्यक्ष उमेश वाल्हे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॉ चंद्रकांत पाटील,तालुका कार्यवाहक हितेश शहा,शहर कार्यवाह संकल्प वैद्य,सह कार्यवाह विजय पाटील,प्रकाश ताडे,बजरंग दलचे जिल्हा सह संयोजक आशिष दुसाने आदी उपस्थित होते.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *