
यावल बाजार समितीत सर्वपक्षीयांकडून हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
यावल बाजार समितीत सर्वपक्षीयांकडून हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
यावल(तेज समाचार प्रतिनिधि): दिनांक 18 गुरुवार रोजी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय माजी खासदार आणि रावेर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार आणि दिवंगत ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना यावल तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
लोकप्रिय कृतिशील नेतृत्व असलेले तसेच विधानसभेत लोकसभेत जनहिताचे प्रश्न व शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी संदर्भात सतत पाठपुरावा करणारे तसेच राजकारणात विरोधकांनाही विश्वासात घेऊन आणि त्यांचे कामे करून देणारे हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी भाजपाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, यावेळी भारत चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
येथील बाजार समिती सभागृहात सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्यातर्फे हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सर्वपक्षीयांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, शोकसभेत यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा बॅंकेचे संचालक गणेश गिरधर नेहेते, हे बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे, हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, संचालक राकेश फेगडे, सौ.कांचन फालक, स्वीकृत नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, विलास चौधरी शिवसेनेचे पदाधिकारी जगदीश कवडीवाले, रवींद्र सोनवणे, संतोष खर्चेेे, शरद कोळी, पप्पू जोशी, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष विजयसिंह पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, पंचायत समिती माजी सभापती हर्षल पाटील, रिपाईचे अरुण गजरे, पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, भाजपाचे शहराध्यक्ष उमेश फेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी देवकांत पाटील, भरत बारेला, उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाळू उर्फ हेमराज फेगडे, यांच्यासह तालुक्यातील उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हरिभाऊ जावळे यांनी रावेर मतदार संघात शेती व सिंचनासाठी केलेल्या भरीव कामगिरी बाबत आठवणींना उजाळा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.