यावल येथे ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस असोशियन बैठक संपन्न

Featured जळगाव
Share This:

यावल येथे ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस असोशियन बैठक संपन्न.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांची उपस्थिती.

यावल (सुरेश पाटील): यावल येथील गंगेश्वर महादेव मंदिरात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस असोसिएशनची बैठक संपन्न झाली.
दिनांक 9 फेब्रुवारी2021 रोजी यावल शहर गंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस असोशियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांच्या उपस्थितीत यावल शहरातील तसेच तालुक्यातील रेल्वे अप्रेंटिस तरुणांची मोठ्या संख्येने बैठक घेण्यात आली या बैठकीत दिनांक 12 फेब्रुवारी रोजी AIRF (ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन) चे महामंत्री शिवगोपाल मिश्रा साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत भरातील रेल्वे अप्रेंटिस तरुण हे एक दिवसीय देशव्यापी, धरणें आंदोलन रेल्वेच्या डी आर एम व जीएम ऑफिसच्या समोर करणार आहेत. आंदोलनाचे मुख्य उद्देश्य असे आहे की, रेल्वेबोर्डाने रेल्वे अप्रेंटिस तरुणांबद्दल चुकीचे नियम लागू केले आहेत यामुळे देशातील हजारो रेल्वे अप्रेंटिस तरुण हे बेरोजगार झाले आहेत याआधी रेल्वे बोर्ड रेल्वे अप्रेंटिस केलेल्या तरुणांना जी एम पावर नियमांनुसार रोजगार द्यायचे कारण रेल्वे अप्रेंटिस तरुण हे रेल्वेचे प्रशिक्षण घेतात तीन वेळा परीक्षा पास करून एनसीवीटी चे प्रमाणपत्र प्राप्त करतात यासाठी खूप पैसा व जवळ जवळ दोन ते तीन वर्षाचा कालावधी खर्च करतात रेल्वेचे काम शिकतात परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेरोजगार होतात, मग रेल्वेचे प्रशिक्षण काय कामाचे की, जे रोजगार नाही देऊ शकत?? आता रेल्वे बोर्डाने पुन्हा परीक्षा द्या असे म्हणत RRB मध्ये 20 टक्क्यांचा कोठा देऊन आधीचा शंभर टक्के भरला जाणारा कोठा रेल्वे बोर्डाने काढून घेतला आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळे हजारो युवकांचे भवितव्य हे मरणाच्या खाईत ढकलणे जात आहे तसेच भारत सरकार ही मोठ्या प्रमाणात रेल्वेचे खासगीकरण करत आहे.
यामुळे गरीब जनतेची होणारी फसवणूक,लुटमार तसेच खूप मोठे बेरोजगारीचे संकट युवकांवर येणार आहे. यासाठी सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध 12 फेब्रुवारी रोजी AIRF च्या एक दिवशीय आंदोलनात बेरोजगार रेल्वे अप्रेंटिस युवक सहभागी होणार आहे, देशातील सर्व जनतेला आव्हान आहे की आपण आंदोलनात सहभागी होऊन रेल्वे की जी देशाची आर्थिक तसेच राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यासाठी आपले योगदान द्यावे. ये देश नाही झुकने दूंगा, ये देश नही बिकने दुंगा, ये देश नहीं झुकने दुंगा चा नारा देणारेच आज देशाची संपत्ती म्हटली जाणारी रेल्वे आज विकायला काढली. बैठकीत अनेक विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *