वनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा

Featured जळगाव
Share This:

वनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा

 

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील वनोली येथील श्री साईबाबा मंदिराच्या 563 वा महोत्सव covid-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रथमच रद्द करण्यात आला असून मात्र विधिवत पूजा मंदिरात मोजक्या ब्राह्मण वृद्धांच्या उपस्थितित पूजा विधी करण्यात येणार असून अष्टमीला होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम ही रद्द करण्यात आल्याची माहिती वनोली साईबाबा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष तथा यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांनी दिली.

यावल तालुक्यातील वनोली हे गांव बामणोद व पाडळसा पासून तिन किलोमीटर अंतरावर आहे या गावी श्रीसाईबाबा महाराजांनी वास्तव्य केले असल्याची आख्यायिका होती आणि आहे त्याकाळी दुष्काळ पडला तेव्हा कोणाकडेही खायला अन्नधान्य गोडेतेल नव्हते चक्क महाराजांनी पाण्यावरती इथे नंदादीप सुरू ठेवला होता घटस्थापनेच्या दिवशी अश्विन महिन्यात याठिकाणी घटाची पूजा केली जाते घटस्थापना होते.

तसेच आठ ते नऊ दिवस या ठिकाणी विविध पूजा विधी कार्यक्रम होत असतात त्यात विधिवत पूजा झाल्यानंतर नवग्रह पूजा होम पूजन ग्रामदेवता पूजन व धार्मिक कार्यक्रम होऊन अष्टमीच्या दिवशी कुवार का बसून त्याचे पूजन करुण महाप्रसाद तिस ते चाळीस हजार लोकांसाठी करण्यात येत असतो या महाप्रसादा मध्ये खीर चक्री म्हणजे पोळ्या गंगा फळाची भाजी व उडदाच्या डाळीचे वडे सर्वांना पुरतील एवढे पोटभरून मंदिर विश्वस्त समितीकडून दिले जातात आणि नवमी व दसऱ्याला सव्वाशे फूट देव काठी मोर नदीवर नेऊन वाजत-गाजत तिला रंगीत वस्त्र परिधान करून धुऊन आणली जाते व संध्याकाळी गांवामध्ये बारा गाड्या व तमाशा यांचा कार्यक्रम ही लोकनाट्य करमणुकीसाठी ठेवले जातात

या छोट्याश्या गावी सर्व नातेवाईक ज्या त्या ठिकाणाहुन येऊन मोठी गर्दी, वर्दळ होतअसते प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे तर्फे दरवर्षी या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवली जाते तर फैजपूर पोलिसांकडून सुरक्षेचे सर्व बंदोबस्ताची जबाबदारी असते याठिकाणी तहसीलदार प्रांताधिकारी व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी सुद्धा या दिवशी भेट देतात विशेष म्हणजे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून भाविक याठिकाणी यात्रेनिमित्त मोठी गर्दी करीत असतात व आपली मानता मानीत असतात साईबाबा मंदिरात कोणी गोडेतेल तर कोणी नारळ अर्पण करीत या ठिकाणी दोन नंदा दिप सतत 562 वर्षापासून अखंड जळत असून कधीही याठिकाणी तेल कमी पडले नाही याठिकाणी पर्यटन स्थळ विकासा मधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी, तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, व इतर नेत्यांकडून मोठा निधी या ठिकाणी मिळवण्यासाठी हातभार लागलेला आहे. यावर्षी covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग पाडण्यासाठी व कोरोना प्रादुर्भाव रोगही उद्भवू नये म्हणून शासनाने दिलेल्या नियमानुसार घटस्थापना करण्यात आली असून दररोज पुजारी व भगत ही पूजा विधी करत आहेत त्यात सोशल डिस्टंसिंग पाडून हे काम सुरू असून मंदिर गेटला कुलूप राहणार आहे. सोशल डिस्टंसिंग काढून बाहेरूनच दर्शन भाविकांना घेता येईल मात्र शक्यतोवर भाविकांनी गर्दी करू नये व शक्‍यतोवर याठिकाणी येणे टाळावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्ट वनोली तालुका यावल अध्यक्ष हिरालाल व्‍यंकट चौधरी व सहकाऱ्यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *