अभिनेता अली झफर वर मेकअप आर्टिस्ट ने लावला लैंगिक अत्याचाराचा आरोप

Featured मुंबई
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क) प्रसिद्ध अभिनेता, गायक अली झफरविरोधात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मेकअप आर्टिस्ट लीना घानी हिने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे. अनेक वर्षांपासून अली झफर यांच्याकडून माझ्यावर अत्याचार होत आहे. त्यामुळे आता मी माझ्यासाठी लढायचं ठरवलं आहे. त्यांनी मला कोर्टात जायला सांगितलं त्यामुळे आता मी कोर्टातच त्यांच्याशी लढणार असल्याचं लीना घानीने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे.

लीनापूर्वी एका पाकिस्तानी गायिकेने अली झफरविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. लीनाने सिंध उच्च न्यायालयात खटला दाखल करत अलीविरोधात 50 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. दरम्यान, अली झफर बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. त्याने तेरे बिन लादेन, लंडन पॅरिस, मेरे ब्रदर की दुल्हन, डिअर झिंदगी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये गायन देखील केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *