अक्षय कुमार ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी
अक्षय कुमार ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी
मुंबई (तेज समाचार डेस्क): बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज करतो . तर आता आणखी एका गोष्टीसाठी अक्षयच नाव टॉपला झळकत आहे. नुकत्याच नामांकित फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षयच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
फोर्ब्सने नुकतीच जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली. यात जून 2019 ते मे 2020 या काळातील जगातल्या पहिल्या 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात एकमेव भारतीय सेलिब्रेटी अक्षय कुमारचा समावेश आहे. या यादीत अक्षय कुमार USD 48.5 मिलियन म्हणजे भारतीय 366 कोटींच्या कमाईसह 52 व्या क्रमांकावर आहे. तर कायली जेनर USD 590 मिलियन म्हणजे भारतीय 4,453 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे.
यावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे . तुम्हाला कालांतराने स्वतःला बदलावे लागते. आज चित्रपटांच्या कथा बदलल्या आहेत. प्रेक्षक बदलले आहेत. तर अगदी माझ्या चेकवरील शून्य देखील बदलले असल्याचे अक्षय म्हणाले.