
अकोट: अवैध दारूची वाहतूक, एक जण ताब्यात
अकोट: अवैध दारूची वाहतूक, एक जण ताब्यात
अकोला (तेज़ समाचार प्रतिनिधि ): अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीग्राम जवळ अवैध देशी दारुची वाहतूक दुचाकीवरून करित असल्याची माहिती मिळताच, दहीहांडा पोलिसांनी दारु सहीत एकास ताब्यात घेतले. त्यांच्या जवळुन १० हजार रु ची अवैध देशी दारु व मोटारसायकल अंदाजे किंमत १५ हजार असा एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.लगातार आठ दिवसात अवैध देशी दारूची विक्री व जुगार खेळणाऱ्यांवर ४ मोठ्या कारवाया प्रेमानंद कात्रे यांनी केल्या आहेत.त्यामुळे दहिहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.