
पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूकसंमतीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,यावल तर्फे निषेध
पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूकसंमतीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,यावल तर्फे निषेध
यावल ( सुरेश पाटील ): दि.31 रोजी धुळे येथे अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्यावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूक संमतीने पोलिस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज व बुक्याच्या मारा केला. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा यावल तर्फे आज दिनांक 1 रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांना मारहाण करताना कार मधून बघ्याची भूमिका घेणारे पालक मंत्री अब्दुल सत्तार व सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचे वचन देणारे परंतु नापास करणारे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अ.भा.वि.प. केली आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात,अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल.
यावेळी यावल तालुका प्रमुख अनिकेत सोरटे सह तालुका प्रमुख मयुर पाटील,शहर मंत्री जतीन बारसे,नगरसेवक डॉ कुंदन फेगडे,(अभाविप कार्यकर्ते ) तेजस भोईटे,गौरव कोळी(मनविसे) स्नेहल फिरके,(वी.वा.संघटना) अविनाश बारी(वि वा संघटना) जयवंत माळी, उजवल कानडे,कोमल इंगळे,धनंजय बारी, रितेश बारीअभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.