पालकमंत्री अजित पवारांनी पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास, चक्क तिकिट काढून

Featured पुणे महाराष्ट्र
Share This:

 

पुणे (तेज समाचार डेस्क). उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे 6 वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली . यादरम्यान धावत्या मेट्रोत पवार यांनी चक्क तिकीट काढून प्रवासही केला. पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरीपर्यंतच पहिला प्रवास केला. मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं काढली जाणार आहेत, त्यांचं पुनररोपन कसं केलं जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली.यासंदर्भात एक व्हिडओदेखील समोर आला आहे.

अजित पवारांनी पहाटे पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्यानंतर मेट्रो संदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे वळाला. यावेळी अजित पवार हे मेट्रो चालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या असून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *