
अट्रावल येथील जागृत मुंजोबा ने घेतला अग्नीडाग
अट्रावल येथील जागृत मुंजोबा ने घेतला अग्नीडाग.
यावल ( सुरेश पाटील): तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबाने आज दि.12 मार्च 2021 शुक्रवार रोजी संध्याकाळी6:30 वाजेच्या सुमारास अग्नीडाग घेतला.
संपूर्ण खानदेशातील भाविकांचे,नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले अट्रावल तालुका यावल येथील जागृत मुंजोबाची यात्रा दरवर्षी माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि सोमवारी भरत असते,यात्रेत संपूर्ण खान्देशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठी गर्दी करून अनेक भाविक मुंजोबाला वरण,बट्टी चा नैवेद्य दाखवून आपला मानलेला मान देत असतात.मुंजोबा देवस्थानात असलेल्या मुंजोबा बाणावर अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने लोणी चढवून पुष्पहार अर्पण करून पूजा करीत असतात, मुंजोबाला अर्पण केलेल्या या सर्व वस्तू मुंजोबा च्या प्रतिमेवर तथा बाणावर जशाच्या तशाच पडून असतात यात्रा संपल्यानंतर मुंजोबा अचानक अग्नीडाग घेऊन या वस्तू जळून जात असल्याची आख्यायिका आहे, ही अग्नी डाग घेण्याची वेळ/प्रक्रिया अनिश्चित असून मुंजोबा केव्हाही अग्नीडाग घेतो मागील महिन्यात यात्रा संपल्यानंतर एक महिन्यानंतर अग्नीडाग घेतला गेला, बऱ्याच वेळेला चार–चार, पाच –पाच महिने मुंजोबा अग्नीडाग घेत नसल्याचे सुद्धा अट्रावल परिसरासह संपूर्ण तालुक्यात बोलले जाते.