
नवापूर येथे ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे आक्रमक भूमिका
नवापूर येथे ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे आक्रमक भूमिका
नवापूर (तेज समाचार प्रतिनिधी ): नवापूर शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची तालुकास्तरीय सर्वपक्षीय, सर्वजातीय बैठक संपन्न झाली होती. नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक नितीन शेलार समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर माळी यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच सभा संपन्न झाली होती या प्रसंगी covid-19 सर्व नियमांचे पालन करून शांततेत कुठल्याही नियमाचा भंग न करता तहसील कार्यालयाच्या समोर आरक्षणासंदर्भात घोषणा देऊन प्रत्यक्षात ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिका प्रा. डॉ.नितीनकुमार माळी यांनी मांडली. यात ओबीसी आरक्षणात कोणत्याही जातींचा समावेश करू नये, कारण त्यात प्रत्यक्ष ओबीसी 52 टक्के समाज असताना सुद्धा त्यांना 19 टक्के आरक्षण मिळाले आहे या आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात या बांधवांसाठी आरक्षण दिलेच पाहिजे पण त्यासाठी वेगळी तरतूद करावी. परंतु ही तरतूद करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. 18 पगड जाती असलेला ओबीसी बांधव याला आरक्षणापासून वंचित करू नये यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. या मागण्यांसाठी नवापूर शहर तसेच नवापूर तालुक्यातील ओबीसी अंतर्गत सर्व समाजातील बांधवांनी तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. सर्वांनी मास्क लावून कुठल्याही प्रकारे शासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता शांततेत तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. तमाम सर्व ओबीसी अंतर्गत येणाऱ्या समाज बांधवांनी उपस्थिती दिली. यात निवेदन देताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहादा शहराध्यक्ष जगदीश माळी, तालुका अध्यक्ष प्रदीप चौधरी, मंगेश येवले, उत्तमराव महाजन, रामचंद्र ततार, श्याम भाऊ चौधरी, रामचंद्र सोनवणे, पांडुरंग सोनवणे, राजेंद्र बागड, सुधीर निकम, मोहन चौधरी, जगदीश चव्हाण, योगेश जगताप, भास्कर मोरे, राधेशाम जयस्वाल, महेंद्र चव्हाण, मयूर वाणी, सोनज भांडारकर, जितेंद्र भावसार, सलीम मंसूरी, निखिल मिस्तरी.