मृत्यूनंतर आइन्स्टाईनचा मेंदू कापून करण्यात आले होते २४० भाग !

Featured महाराष्ट्र
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क):अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein)यांचा जन्म १४ मार्च १८७९ साली तात्कालीन जर्मन साम्राज्यातील उल्म शहरात झाला. त्याचं कुटुंब यहुदी होतं. तिथं जर्मनीच्या व्यूर्टेगबेग राजघराण्याचा अंमल होता. आइन्स्टाइन यांच बालपण म्युनिकमध्ये गेलं. भाषा विषय सोडून आइन्सटाइन यांना प्रत्येक विषयात रस होता. लहानपाणापासून त्यांनी बरीच विज्ञान कथेची पुस्तकं वाचली. जर्मनीऐवजी त्यांच्याकडे स्वीत्झर्लँड आणि ऑस्ट्रीयाची नागरिकताही त्यांना मिळाली होती. १९१४ पासून ते १९३२ पर्यंत जर्मनीत यहुदींचा घृणा केली जात होती. याला कंटाळून त्यांनी अमेरिकेचा रस्ता धरला. आणि अमेरिकेतल्या प्रिन्सटन येथील दवाखन्यात १८ एप्रिल १९५५ साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

म्हणून आइनस्टाइन इतके प्रतिभावंत होते.

जगाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या विज्ञान संशोधनामुळं झालं. आजही जगभरात प्रतिभा आणि प्रज्ञेचा पर्मोच्च बिंदू म्हणून त्यांना ओळखलं जातं; आइनस्टाइन यांच्या प्रतिभेमागं नेमकं काय कारण होतं? कशामुळं त्यांना प्रगल्भ बुद्धीमत्ता लाभली या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आला. आइनस्टाइन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी समोर आलेल्या संशोधनानूसार, त्यांच्या मेंदूवर असणाऱ्या जास्तीच्या घड्या त्यांच्या बुद्धीमत्तेस कारणीभूत होत्या. हे आता स्पष्ट झालंय. त्यांच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घड्या होत्या, त्यामुळे ते वेगळय़ा पद्धतीने विचार करायचे, कल्पनाशक्तीचा वापरही ते करायचे, त्यामुळंच त्यांनी विज्ञानजगातावर आपल्या नावाचा ठसा उमटवला. म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला होता.

२४० भागांमध्ये मेंदूचं करण्यात आलं होतं विभाजन

नोबेल विजेते वैज्ञानिक आइनस्टाइन यांचा मेंदू २४० भागांत विभागण्यात आला. (Einstein’s brain was cut in 240 parts)हे भाग १९५५ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर वैज्ञानिकांना अभ्यासासाठी देण्यात आले होते. त्यातीले अनेक नमुने नंतरच्या काळात गहाळ झाले. त्यामुळे शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या मेंदूविषयी फार लिहिले गेले नाही. वैज्ञानिकांनी आता त्याच्या मेंदूच्या छायाचित्रांचा वापर करून २४० भाग जुळवले असून त्याच्या मदतीने अभ्यास करण्यात आला.

थॉमस हॉर्वी यांनी केलं होतं संशोधन

जागतिक किर्तीचे चिकित्सक थॉमस हार्वी यांनी आइनस्टाइनचा मेंदू काढून घेतला होता व त्यांने त्या मेंदूचे विभाग करून त्याची वेगळी वैशिष्टय़े सांगितली होती. आइनस्टाइन यांच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घड्या व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मानववंशशास्त्रज्ञ डीन फॉक यांनी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत जे संशोधन केले आहे त्या मेंदूच्या पालीत (लोब) अनेक गुंतागुंतीची वेटोळी होती. आइनस्टाइनच्या मेंदूच्या यापूर्वीच्या दोन अभ्यासात असे दिसून आले होते, की त्याच्या मेंदूतील आटय़ासारखे भाग हे त्याच्या प्रज्ञेचे खरे कारण असावे.

फॉक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रेन नावाच्या नियतकालिकात असे म्हटले आहे, की आइनस्टाइनच्या मेंदूचे काही भाग हे मोठे होते जे चेहरा किंवा जीभ यांच्याकडे तसेच मेंदूकडे चेतासंवेदना तातडीनं पाठवण्याचं काम करायचे. मेंदूतील प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तो मोटर कॉर्टेक्सचा वापर असामान्य विचारांसाठी करीत असे, यामुळं अल्बर्ट आइन्स्टाइन यांची बुद्धीमत्ता इतरांहून अधिक होती असं मानलं जातं.

हिटलरनं आइनस्टाइन्स यांच्या हत्त्येसाठी दिली होती पाच हजार डॉलर्सची सुपारी

१९३२ साली आइनस्टाइन यांनी जर्मनी सोडली. १९३३ ला जर्मनीची सत्ता हिटलर यांच्या हातात आली. १० मे १९३३ ला हिटलरचा प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स यांनं यहुदी लेखन साहित्य सार्वजनिक ठिकाणी जाळायला सुरुवात केली. आइन्सटाइन यांच्या पुस्तकांची ही तिथं होळी करण्यात आली. नंतर जर्मनी राष्ट्रांच्या शत्रुची यादी देखील जाहीर करण्यात आली. ज्यात आइनस्टाइन यांच नावं होतं. आइन्सटाइन यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ५ हजार डॉलर्सचा पुरस्कार देण्याची घोषणा हिटलरनं केली होती.

इस्त्राइलच्या स्वातंत्रदिनाचं भाषण ठरलं शेवटच

अल्बर्ट आइन्टाइन यांनी भौतिक शास्त्रात मोठं संशोधन केलं त्यांनी मांडलेला सापेक्षतावादाचा सिद्धान्त, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमधील संशोधनात त्यांनी विशेष योगदान दिलं. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि “त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी” इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. नोबेल पुरस्काराची गणना जगातली सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक अशी केली जाते.

त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळं जगभरातील विज्ञान संशोधनाची दिशा बदलली. विज्ञानातील भिष्मपितामह म्हणून त्यांची जगभर ओळख निर्माण झाली. १९५५ साली १५ एप्रिलला इस्त्राइलच्या दुसऱ्या स्वातंत्र्य दिनी ते भाषणासाठी उभे राहिले आणि काही वेळेनंतर खाली कोसळले. त्यांना प्रिन्सटन येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं. १८ एप्रिलला वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांच निधन झालं.

शव परिक्षणावेळी डॉक्टरांनी आइनस्टाइन यांचे डोळे आणि मेंदूचा अभ्यास करण्यासाठी ते वेगळे काढून ठेवले. त्यांच्या मेंदूतल्या ठेवणीत त्यांच्या असामान्य विद्वत्तेचे रहस्य उलगडेल अशी डॉक्टरांना आशा होती. आइनस्टाइन यांच्या मुलांनी त्यांच्या मेंदूच्या परिक्षणाची परवानगी दिली होती. त्यांचा मेंदू शिकागोच्या ‘नॅशनल म्युजियम ऑफ हेल्थ अँड मेडिसिन’ मध्ये संग्रहित ठेवण्यात आलाय. जो आजही सामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *