शिरपूर : 44 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत, काही भागात अजूनही अंधारच

Featured धुळे
Share This:

शिरपूर : 44 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत, काही भागात अजूनही अंधारच

 

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) दो दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे शहरातील विविध भागातील विजेचे खांब कोलमोडून पडल्या मुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता, परंतु विद्युत विभागा द्वारे युद्धपातळीवर केलेल्या कामामुळे तब्बल ४४ तासानंतर शहरातील काही भागात विजेचा पुरवठापुर्ववत सुरू करण्यात आला आहे, तरी अद्यापही काही भागात वीज नाही़ शनिवारी सकाळ पर्यंत शहरातील उर्वरीत सर्व भागातील वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचे संकेत वितरण कंपनी अधिका-नी दिले.

मंगळवारी झालेल्या वादळामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा करणारे इलेक्ट्रीक खांब कोलमोडून तर तारातुटल्या मुळे वीजेचा पुरवठा खंडीत झाला होता़ तब्बल ४४ तासानंतर करवंद नाका परिसरात विजपुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला़ मात्र अद्याप ही निमझरी नाका, मेनरोड परिसराचा वीज पुरवठा सुरू झालेला नाही़ शुक्रवारी उर्वरीत काही परिसराचा तर शनिवारी सकाळ पर्यंत राहिलेला संपूर्ण शहराचा वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले़ शहराला वीज पुरवठा होणारे मुख्यवाहिनी चे खांब कोल मोडून पडल्या मुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मराविचे अधिकारी व कर्मचा-यांना रात्र-दिवस मेहनत घ्यावी लागत आहे व नावलगटा सह शिंगावे आदी गावांमध्ये इलेक्ट्रीक खांब कोलमोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत आहे त्या मुळे लवकरच गावठाण फिडर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे़ त्या नंतर शेतीची वीज पुरवठा पुर्ववत सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले़.

– शेतक-यांना नुकसान भरपाई 
शिरपुरातील कॉटर फॅक्टरी चे कापूस व फॅक्टरीतील पत्रा व साहित्य उडून ७० लाखांचे नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस, गारपीठ, वादळीवारा मुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसानझाले़घटनेच्यादुसºयाचदिवशीलोकप्रतिनिधींसहअधिकाºयांनी नुकसान ग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जावून शेतक-यांना धीर दिला़ पीक विमा काढलेले शेतकरी आता बँकेत पावत्या घेण्यासाठी येवू लागले आहेत़ त्यामुळे कोरोनाच्या नावाने बँक बंद करता येणार नाहीत़ त्या पावत्या घेवून संबंधित पिक विमा कंपनीला ते देखील वेळेत देणे आवश्यक आहे़ तहसिलदारांनी तातडीने बँक अधिका-यांची बैठक घेवून बँक अधिका-यांना शेतक-यांना बँकेत न बोलविता त्यांना त्यांच्या गावीच सुविधा मिळण्याची सूचना देखील आमदार काशिराम पावरा यांनी एका बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *