जलवाहिनी जोडणीचा विपरीत परिणाम,सर्व रस्त्यांचे वाजले 12

Featured जळगाव
Share This:

जलवाहिनी जोडणीचा विपरीत परिणाम,सर्व रस्त्यांचे वाजले12

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे न झाल्यास जागोजागी अपघाताची दाट शक्यता.

मुख्याधिकारी आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष नागरिकांत तीव्र संताप.

यावल (सुरेश पाटील): गेल्या5महिन्यापूर्वी यावल शहरातील विकसित भागात जलवाहिनी जोडणीचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले संपूर्ण रस्त्यांचे12 वाजले परंतु खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती वेळीच ठेकेदाराने न केल्यामुळे रस्त्यावर पायदळ चालणे आणि दुचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण किंवा दुरुस्ती न झाल्यास जागोजागी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी सुद्धा यावल नगर परिषद मुख्याधिकारी आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याने यावल शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत यावल नगरपालीका मुख्याधिकारी यांच्याकडे सोमवार दि.10मे2021रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नितिन श्रावण सोनार व कॉलनीतील रहिवाशांनी म्हटले आहे की,नगरपालिकेतर्फे विस्तारीत कॉलनीतील जलवाहिनीच्या जोडणीसाठी डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील खोदलेले खड्डे दुरुस्त न केल्याने काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे कॉलनीतील रहिवाशांचे खूप हाल झाले होते आणि आहे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम न केल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,नगर परिषदेने ठेकेदारामार्फत वेळेपूर्वीच सर्व रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील3महिन्याच्या कालावधीत यावल नगरपरिषदे मार्फत शहरातील विस्तारित क्षेत्रातील सुमारे27ते28कॉलनीमध्ये5कोटी75 लाख रुपयांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नागरिकांना पाणी मिळावे या उद्देशाने युद्धपातळीवर वेगाने जलवाहिनी पाईपलाईन टाकण्यात आली सदरची पाईपलाईन टाकण्याकरीता साधारण 2वर्षांपूर्वी केलेल्या डांबरीकरण रस्त्यास खोदण्यात आल्याने पुन्हा या संपूर्ण वसाहती मधील रस्ते हे खड्डेमय झाले आहेत पुढील महिन्यात पावसाळ्यास सुरुवात होणार असल्याने या वसाहतीमधील रहिवासी नागरिकांना या रस्त्यावरून रहदारी करताना,पायदळ चालताना, दुचाकी वाहने चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार हे आता निश्चित झाले आहे.
विस्तारित वसाहतीमधील गणपतीनगर, कृष्ण तारानगर,फालक नगर, गंगानगर,पांडुरंग सराफनगर तिरुपतीनगर, भास्करनगर,स्वामीसमर्थ नगर,आयशानगर,चांदनगर,हरिओम नगर,व्यासनगर,गायत्रीनगर आदी परिसरातून जलवाहिनी पाईपलाईन साठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत येणाऱ्या पावसाळ्यात याचा मोठा त्रास व मनस्ताप होणार आहे नगरपरिषदेने वेळेपूर्वीच समयसूचकता बाळगून तात्काळ रस्ते दुरुस्तीचे कामे करायला पाहिजे होती पण तसे यावल नगरपालिकेने केलेले नाही आता तरी यावल नगरपालिका मुख्याधिकारी नगराध्यक्ष नगरसेवकांनी तात्काळ या नादुरुस्त रस्त्यांवर उपाययोजना करावी तसेच कोरोनाची विद्यमान परिस्थिती लक्षात घेता पाईप लाईन जोडणी नंतर नवीन कनेक्शन घेण्यासाठी असलेली आकारणी फी कमी करावी अशी मागणी विकसित भागातील नागरिकांसह नितिन श्रावण सोनार यांनी व इतर रहिवाशी नागरिकांनी केली आहे.पावसाळ्याच्या आत विकसित भागातील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या समस्यांसंदर्भात नगरपालिका निवडणुकीत संबंधीत इच्छुक उमेदवारांना जबाब द्यावा लागणार एवढे मात्र निश्चित.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *