मुंबईतील प्रवेश 1ऑक्टोबरपासून महागणार

Featured मुंबई
Share This:

मुंबईतील प्रवेश 1ऑक्टोबरपासून महागणार

मुंबई  (तेज समाचार डेस्क): 1 ऑक्टोबर पासून नागरिकांना टोलचा झटका बसणार आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलच्या दरात वाढ होणार आहे. या एन्ट्री पॉईंटवर 5 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. मुंबईतील मुलुंड, दहिसर, वाशी, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत.

येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ होणार आहे.मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणार्‍यांना आता 1 ऑक्टोबरपासून वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके  आहेत. महानगर प्रदेशातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च सन 2002 ते 2027 अशा 25 वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके  उभारण्यात आले असून राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ होत असून कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर 40 रुपये होईल. मिनी बस, 12 ते 20 प्रवाशांची वाहतूक करणार्‍या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 65 रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात 105 वरून 130 अशी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल 135 रुपयांवरून 160 रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये होणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *