
चालू शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्हा याचे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार ! आमदार – खासदार गावित यांचा प्रयत्नांना यश
चालू शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्हा याचे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार ! आमदार – खासदार गावित यांचा प्रयत्नांना यश
नंदुरबार (वैभव करवंदकर ): नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ज्यावेळेस राजकारणात प्रवेश केला त्यावेळेपासून नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी असे असंख्य प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आल्या. आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी 2014 पासून केंद्र शासनाकडे सातत्याने प्रयत्न करून मंजुरी मिळवली त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन , राज्यांचे आरोग्य मंत्री यांचे आभार मानले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी तसेच डॉक्टर संघटना यांचे देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आ. डॉ. गावित यांनी आभार मानले आहेत. – आ.डॉ. गावीत म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय रुग्णाचे प्रभारी डि.न. यांनी मंजुरी साठी लागणारे कागदपत्रेची पूर्तता लवकर केल्यामुळे सन 2020 शैक्षणिक वर्ष यात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी लागणारे संपूर्ण व्यवस्था करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून 195 कोटी तसेच राज्य शासनाकडून 130 कोटी निधीदेखील उपलब्ध झाला आहे. लवकरच 48 एकर भूखंडावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ची इमारत करण्यात येणार आहे. खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या की माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे. त्या म्हणाल्या नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून धुळे , नाशिक , मुंबई तसेच शेजारी राज्य गुजरात येथील सुरत तेथे आरोग्य सेवा घेण्यासाठी नागरिकांना जावे लागत असते. तसेच जिल्ह्यात कुपोषण सारखे असंख्य प्रश्न असल्यामुळे मी ज्यादिवसा पासून राजकारणात आलो आहे. त्यादिवसा पासून ठरवले होते. नंदुरबार जिल्हायांचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झाले पाहीजे.