उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्याबाबत प्रशासकीय मान्यता

Featured जळगाव
Share This:

उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्याबाबत प्रशासकीय मान्यता.

यावल शहरातील विकसित भागात लवकरच पाणीपुरवठा होणार सुरळीत.

यावल (सुरेश पाटील): शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावाजवळ उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांनी दि.4ऑक्टोंबर2021रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली. प्रशासकीय मान्यताचा आदेश बघितला असता यावल शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलाव येथे उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविणे साठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी26लाख96हजार195 रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. गेल्या20ते25 वर्षापासून यावल शहरातील विकसित भागात पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन आणि पाण्याची टाकी नसल्यामुळे यावल नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होत नव्हता त्यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी10लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून74लाख रुपयांचा निधी प्राप्त करून3वर्षापूर्वीच म्हणजे सन2017-18 मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते आणि आहे.गेल्यावर्षी संपूर्ण विकसित भागात नवीन पाईप लाईन टाकून त्यावर नळ कनेक्शन जोडणीचे काम नगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर करण्यात आले.परंतु साठवण तलावाजवळ आणि जलशुद्धीकरण केंद्राजवळ उच्च दाब कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर नसल्यामुळे विकसित भागात पाणीपुरवठा होत नव्हता परंतु आता लवकरच उच्चदाब कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविले जाणार असल्याने यावल शहरातील विकसित भागात व यावल शहरात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा लवकरच सुरु होणार आणि नागरिकांची पाण्याची समस्या मिटणार असल्याची माहिती सुद्धा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दि

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *