
नंदुरबार : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदे अध्यक्षांच्या हस्ते प्रदान
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) प्राथमिक शिक्षण विभाग़, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मा. ॲड. सीमा पदमाकर वळवी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या. ह्या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी , उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती जिल्हा परिषद, नंदुरबार, मा. सौ. जयश्री दिपक पाटील , आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद, नंदुरबार, मा. श्री. रतन पाडवी सभापती समाज कल्याण समिती, मा. सौ. निर्मलाबाई सिताराम राऊत सभापती , महिला व बालकल्याण जिल्हा परिषद, नंदुरबार , मा. शेखर रौंदळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार तसेच मा. रमेश चौधरी अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार लाभले. प्राथमिक शिक्षण विभाग़, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बुधवार दिनांक 16 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता याहामोगी सभागृह, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विशाल दिलीप पाटील , जिल्हा परिषद शाळा, अजेपूर ता. नंदुरबार , हेमंत बाबुराव सुर्यवंशी , जिल्हा परिषद शाळा, वडसत्रा ता. नवापूर , रविंद्र सजन बैसाणे , जिल्हा परिषद शाळा, म्हसावद (मुली) ता. शहादा , नितीन बन्सीलाल महाजन , जिल्हा परिषद शाळा, दलेलपूर ता. तळोदा , जगदीश देवीदास पाटील , जिल्हा परिषद शाळा, चिवलउतार ता. अक्कलकुवा , अनिल फुरता पाडवी
जिल्हा परिषद शाळा, चिंचकाठी ता. धडगांव , सौ. सुशिलाबाई अंकुशराव पाटील जिल्हा परिषद शाळा, बलवंड ता. नंदुरबार महिला प्रवर्ग विशेष पुरस्कार , श्रीमती रेखा सुरेश पाटील , जिल्हा परिषद शाळा,टेंभली ता. शहादा महिला प्रवर्ग विशेष पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर. रोकडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि आभार प्रदर्शन एम.व्ही. कदम शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी तर सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.