
अभिनेता सनी देओल कोरोनाग्रस्त
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी माहिती दिली आहे.
मनालीमध्ये ते काही दिवसांपासून राहत होते. सनी देओल यांना ताप आणि गळ्यामध्ये खवखव जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केल्याने त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मनालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित ठाकुर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांमागे सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते आराम करण्यासाठी मनालीमधील आपल्या फार्महाऊसवर थांबले होते. 3 डिसेंबरला ते मुंबईला येणार असल्याची माहिती समजत आहे. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, सनी देओल हे पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत.