
हिंगोणा येथे अवैध वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई
हिंगोणा येथे अवैध वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई
यावल (सुरेश पाटिल ): तालुक्यातील हिंगोणा येथुन अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर हिंगोणा मारूळ रस्त्यावर प्राथमीक आरोग्य केंद्रा जवळ अवैद्य रित्या राजरोसपणे वाहतूक करीत असताना हिंगोणा येथील तलाठी दिपक गवई, भालोद तलाठी जे. डी. भगत, अट्रावल तलाठी एन. जे. धांडे तसेच हिंगोणा येथील कोतवाल सुमन आंबेकर, पो़लीस पाटील दिनेश बावीस्कर यांनी आज दि १२ शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा च्या समोर गाडी नं एम एच १९ सी वाय ८६८६ या डंपर पकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली व घटनास्थळी डंपरचा पंचनामा करण्यात केला तसेच सदर डंपर फैजपुर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे डंपर मालकावर दंडात्मक कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे