यावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद.

तापी नदी परिसरातून शिरागड पथराळे मार्गे संपूर्ण यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक.

यावल (सुरेश पाटील): तापी नदी पात्र तसेच नदी नाल्यातून यावल तालुक्यात शिरागड पथराळे थोरगव्हाण परिसरातून अवैध वाळू वाहतूकीची तस्करी जोरात सुरू असून संपूर्ण यावल तालुक्यात अवैध वाळू पुरवठा होत आहे.वाळू पुरवठा करणारे वाळू तस्कर ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने सोयीनुसार वेळ पाहून वाजवीपेक्षा जास्त दराने अवैध वाळू विक्री करीत आहे. याकडे यावल तहसीलदार यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने तसेच शासकीय कामे करण्यासाठीसुद्धा शासकीय ठेकेदारांनाच यावल तहसील मधून अधिकृत वाळू वाहतुकीचे परवाने मिळत नसल्याने अवैध वाळू तस्करांना सुगीचे दिवस आले असून याकडे महसूल विभाग जाणून बुजून वाळू तस्करी करणाऱ्यांना सहकार्य करीत आहे का?असे संपूर्ण यावल तालुक्यात बांधकाम व्यावसायिकांमध्ये बोलले जात आहे.
यावल तालुक्यात यावल तहसील पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर तापी नदीपात्रातून तसेच नदी नाल्यातून शिरागड,पथराळे,थोरगव्हाण, मनवेल,शिरसाड,साकळी,वड्री सातोद,कोळवद,डों.कठोरा, अंजाळे, बोरावल,भालशिव, पिंप्रि,भालोद,बामणोद,पाडळसा, हबर्डी, हिंगोणा परिसरात बांधकाम व्यावसायिकांना आणि इतर नागरिकांना अवैध वाळू पुरवठा होत आहे यात वाळू तस्करी करणारे आपल्या मर्जीनुसार अवैध वाळूचे दर संबंधितांकडून वसूल करीत आहे. दिवस-रात्र अवैध वाळू वाहतूकी कडे महसूल चे दुर्लक्ष होणे म्हणजे त्यांच्या कर्तव्याबाबत यावल तालुक्यात संशय व्यक्त केला जात आहे तरी जिल्हाधिकारी जळगाव,गौण खनिज विभाग जळगाव,फैजपु्र भाग प्रांताधिकारी यांनी आपले लक्ष केंद्रित करून कडक कारवाई करावी तसेच शासकीय बांधकामांसाठी शासकीय ठेकेदारांना वाळू वाहतुकीचे रीतसर परवाने दिल्यास शासनाच्या महसुलात मोठी वाढ होईल आणि वाळू तस्करांना आळा बसेल असे सुद्धा आता बांधकाम क्षेत्रात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *