
माक्स वापर न वापणाऱ्यावर पोलीस बंदोबस्तात दंडात्मक कारवाई – यावल नगरपरिषदेची सतर्कता- पहा व्हिडिओ
माक्स वापर न वापणाऱ्यावर पोलीस बंदोबस्तात दंडात्मक कारवाई.
यावल नगरपरिषदेची सतर्कता.
यावल ( सुरेश पाटील): दुकानात किंवा किरकोळ व्यवसायिक तसेच मोटर सायकलवरून किंवा पायदळ फिरणारे माक्स न लावता आढळून आल्यास यावल नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात संबंधितांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली. यामुळे आज संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेन्द्र कुंवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे यावल तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतः व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यावल शहरात व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये वेळोवेळी बेधडक कार्यवाही केली आहे त्याचा सकारात्मक परिणाम आज दिसून येत असला तरी पुन्हा यावल शहरात कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून यावल नगरपरिषदेने पुन्हा सतर्कता बाळगून मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या आदेशान्वये आज दिनांक 13 गुरुवार रोजी यावल नगरपालिकेतील कर्मचारी विजय बढे, पंडित सावकारे, राजेंद्र गायकवाड, पांडे , सुनील उंबरकर, मधुकर गजरे पो.कॉ. भास्कर नागपाल, राजेंद्र महाजन होमगार्ड ईश्वर चित्ते यांनी संपूर्ण यावल शहरात व मेनरोडने फिरून प्रत्येक दुकानात जाऊन दुकानातील ज्या व्यक्तीने माक्स लावले नाही त्याच्याकडून रुपये 500 दंड वसूल केला तसेच मोटरसायकल चालक माक्स न लावता आढळून आल्यास त्याचे कडून जागेवरच शंभर रुपये दंड वसूल केला. याप्रकारे अनेकांनवर दंडात्मक कारवाई झाल्याने संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे.