कोरोना शासन नियमांचे उल्लंघनकेल्यास कारवाई : मुख्यधिकारी

Featured जळगाव
Share This:

पारोळा ( विशाल महाजन ) – शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.अश्या गंभीर स्तिथीत कोरोनाचा अटकाव करण्यासाठी खबरदारी बाळगणे, मास्क वापरणे,सोशल डीस्टंसिंग पाळणे आवश्यक आहे.मात्र तरीही काही नागरिक बेफिकिरपणे वागताहेत अश्या शासन नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार न.पा. मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यधिकारी डॉं.विजयकुमार मुंढे प्रसिद्धीपत्राकद्वारे कळविले आहे.

कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी,अटकाव करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र त्याला नागरिकांचा बेफिकिरपणाचा अडसर आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी बैठकित मास्क न वापरणारे,सोशिल डीस्टंसिंगचे पालन न करणारे व इतर नियमांचे पालन न करणार्‍या नागरिकांवर कारवाईचे स्पष्ट सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर न. पा.मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन न.पा .प्रशासनातर्फे मुख्यधिकारी डॉ.विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *