
शिरपूर व साक्री येथील रेशन दुकानांवर कारवाई अनामत रक्कम जप्त
शिरपूर व साक्री येथील रेशन दुकानांवर कारवाई अनामत रक्कम जप्त
धुळे: (विजय डोंगरे ): रास्त भाव दुकानदार यांच्या विरोधात साक्री तालुक्यातील जैताणे दुकान क्र.12, आणि नाडसे दुकान क्र.133 तसेच शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा दुकान क्र. 86 या रास्त भाव दुकानांच्या विरोधात ग्राहकांना पावती न देणे, जास्तीचे पैसे घेणे शासनाने विहीत केलेल्या प्रमाणात धान्य न देणे, तसेच ग्राहकांशी उद्धटपणे वागणे, इत्यादी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या.
सदर तक्रारींच्या अनुषंगाने मौजे नाडसे ता. साक्री येथील रा. भा. दुकान क्र.133 ची संपुर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. तसेच मौजे जैताणे ता. साक्री दुकान क्र. 12 आणि शिरपूर तालुक्यातील मौजे जामन्यापाडा येथील दुकान क्र. 86 चे प्राधिकापत्र 3 महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आलेले आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविलेले आहे.