
बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल
बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीये.मात्र अनेक जण बनावट ओळखपत्रा काढून रेल्वेने प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या बनावट ओळखपत्रांद्वारे लोकलने प्रवास करणाऱ्या 2 हजार 100 जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
15 ऑक्टाेबरपर्यंत 2 हजार 943 जणांवर विना तिकीट आणि बनावट ओळखपत्र असलेल्या व्यक्तींवर कारवाई केलीये. या कारवाईतून 11,72,280 रूपये इतका दंड वसूल करण्यात आलाय.