गोवंश तस्करी, हत्या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक

Featured जळगाव
Share This:

गोवंश तस्करी, हत्या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक

यावल येथील गोवंश बेकायदेशीर वाहतूक घटना.

गोरक्षकांची समय सूचकता.

यावल ( सुरेश पाटील): गोवंश जातीचा 2 वर्षे वयाचा अंदाजे 15 हजार रुपये किमंतीचा एक बैल हत्या करणेकामी टाटा मॅजिक पिकप वाहन क्रमांक MH–14–DM–1614 मध्ये बेकायदेशीररित्या गुपचुप भरून वाहतूक करीत असताना आढळून आल्याने यावल पोलिसांनी यावल येथील वाहन मालकासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघ् आरोपींना अटक करण्यात आली, घटना आज दिनांक 27 सोमवार रोजी सकाळी 6: 30 वाजेच्या दरम्यान घडली असली तरी गोवंश वाहतुकीची माहिती एका रक्षकाने दिल्यानुसार यावल पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. त्यामुळे त्या गोरक्षकाचे समयसूचकते बाबत सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस शिपाई गणेश मधुकर ढाकणे यांनी यावल पोस्टेला फिर्याद दिली की आरोपी क्र. 1) रईस बिस्मिल्ला खान, 2) साजिद अजिज सय्यद, 3 ) वाहन मालक अब्दुल रशीद अजीज कच्छी सर्व राहणार डांगपुरा यावल. यांनी आज दिनांक 27 रोजी सकाळी संगनमत गोवंश जातीचा तांबड्या रंगाचा बैल वय वर्ष 2 अंदाजे 15 हजार रुपये किमतीचा बैल टाटा मॅजिक पिकप वाहन मधे बेकायदेशीररित्या गुपचूप भरून गोहत्या करणेकरिता वाहतूक / तस्करी करीत असताना मिळून आला त्यांना अडविले असता त्यांनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून गाडी पळवून मूळ मालकाकडे आणून सोडली. म्हणून वरील तिघांच्या विरोधात हत्ते करिता बेकायदेशीर, विनापरवाना गोवंश खरेदी विक्री केली व तस्करी केली म्हणून कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 6, 9 महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियम 11 ( 1 ) मु.पो.का.क. 119 महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम 130 ( 1 ) ,177 , प्रमाणे काय देखील फिर्याद दिली या कारणावरून गुन्हा भाग सहा प्रमाणे रजिस्टर गुन्हा दाखल झाला असून वरील 3 ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पो.हे.कॉ. नितीन चव्हाण हे करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *