अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात-5 ठार

Featured महाराष्ट्र
Share This:
शिर्डी (तेज समाचार डेस्क): अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे पहाटे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले प्रवासी जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.
ट्रॅव्हल्स अहमदनगरहून औरंगाबादकडे जात होती. तर, स्विफ्ट कार औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात होती. देवगड फाट्याजवळ स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले. जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल करण्यात आले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *