“आपले आगंण आपले रणांगण” भाजप पक्षाच्या वतीने ठाकरे सरकार विरोधात – डॉ.सूभाष भामरेच्या नेतृत्त्वात काळे झेंडे फडकत निदर्शन

Featured धुळे
Share This:

“आपले आगंण आपले रणांगण” भाजप पक्षाच्या वतीने ठाकरे सरकार विरोधात माजी रक्षा मंत्री, खासदार डॉ.सूभाष भामरेच्या नेतृत्त्वात काळे झेंडे फडकत निदर्शन.

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): भाजप पक्षाच्या वतीने आज गुरुशिष्य स्मारक चौकात आघाडी सरकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने करण्यात आले.

देशात लॉक डाऊन असताना व लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू असताना राज्यात कोव्हीड/19,कोरोना विषाणू थैमान घातले आहे.अनेकांचे बळी गेले आहेत.मजूरांचे हाल अशा अनेक बाबतीत राज्य सरकार योग्य उपया योजना राबविण्यात अपयशी ठरली आहे.याचाच निषेध करण्यासाठी व बारा बलुतेदारांच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टी वतीने राज्यभर ठाकरे सरकार विरोधात राज्य भर ” मेरा आगंण मेरा रंणागण “आंदोलन पुकारले आज सकाळी गुरू शिष्य स्मारक चौकात भाजप पक्षाचे माजी रक्षा राज्य मंत्री, खासदार डॉ.सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, हिरामण गवळी, सुनिल बैसाणे यांनी हातात काळे झेंडे व महाराष्ट्र राज्य बचाव, महाराष्ट्र करता आर्थिक पॅकेज घोषणा जाहिर करा असे माहिती फलक छळकवत ठाकरे सरकार निषेध असो अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.शहरातील अन्य भागात याच पद्धतीने कार्यकर्त्यांनी निदर्शने करत सहभाग नोंदविला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *