भरधाव ट्रकने महिलेला चिरडलेजागीच मृत्यू, कालिंका माता चौकाजवळील घटना

Featured जळगाव
Share This:

जळगाव, २६ एप्रिल
महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने मोटारसायकलवरील महिलेला चिरडल्याने त्या महिलेचा  जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील कालिंका माता चौकाजवळ रविवारी दुपारी घडली. ती मृत महिला महानगरपालिकेच्या  अतिक्रमण विभागात कामगार असल्याचे समजते.


नशिराबादला सिमेंट भरण्यासाठी जात असलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महानगरपालिकेच्या कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेहानाबी शेख तस्लिम (४२ रा. उस्मानिया पार्क) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक फिरोज शहा कालु शहा (रा.रचना कॉलनी, जळगाव) यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ट्रकचालक व मालक फिरोज शहा हे त्यांचा ट्रक (क्र. एम.एच १५ ई क्यू ७८५७) मध्ये सिमेंट भरण्यासाठी नशिराबाद कडे जात होते. याचवेळी रेहानाबी शेख तस्लीम ह्या दुचाकी (एम.एच १९ बी.टी.९९७१) वरुन शहरात येत होत्या. कालिका माता मंदिराजवळ महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर जागीच रेहानाबी यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती वसीम खान व चार वर्षांची लहान मुलगी सोमिया सोबत होती. ते सुदैवाने बचावल्याची माहिती मिळाली आहे. महिलेकडे असलेल्या महानगरपालिकेच्या ओळखपत्रावरून तिची ओळख पटली.
ट्रकचालकास अटक
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, आसीम तडवी, निलेश पाटील, मुदस्सर काजी, भूषण सोनार यांनी घटनास्थळ गाठले. अपघातानंतर ट्रकसह चालक पसार झाला होता त्याचा पाठलाग करून काही अंतरावर पोलिसांनी त्याला पकडले.
यानंतर कर्मचार्‍यांनी मृतदेह  शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तसेच ट्रकसह चालकास ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *