आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखावतील असा व्हिडीओ व्हायरल

Featured जळगाव
Share This:

आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखावतील असा व्हिडीओ व्हायरल.

तात्काळ कारवाई करण्याची यावल पोस्टेला तक्रार.

यावल (सुरेश पाटील): नुकतेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे अनेक व्हिडीओ व प्रतिक्रिया येत आहे.त्यातच यावल शहरातील एका तरुणाने आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखावतील असा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला अशी तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

शुक्रवार दि.7रोजी सायंकाळी मोठ्या संख्येत मागासवर्गीस समाज बांधव पोलिसा ठाण्यात एकत्र आले व संबधीतावर कारवाईची मागणी केली.पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारी नुसार शहरातील देशमुखवाडा भागातील रहिवासी हेमंत बडगुजर या तरुणाने मोबाईल वर आरक्षणाच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.आणि त्यामुळे इतर आरक्षण उपभोगणाऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या आहे.आरक्षण उपभोगणाऱ्या संर्दभात त्याने केलेल्या वक्तव्यामुळे सामाजीक भावना दुखावल्या व समाजातील अनेक तरूण संतप्त झाले आहेत तेव्हा त्याच्या अशा या व्हायरल व्हीडीओ मुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला तडा जावु शकतो म्हणुन संबधीतावर तात्काळ कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.संबधीत तरुणाविरुद्ध तात्काळ कारवाई केली नाही गेली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सदर प्रसंगी अनिल जंजाळे,विलास भास्कर,विकी गजरे,स्वप्नील पारधे, प्रमोद पारधे,बबलू गजरे,शशिकांत तायडे,निलेश सपकाळे आदींची उपस्थिती होती.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *