रत्नागिरी येथे पोलीस शिपाई म्हणुन नौकरीस असलेल्या आदीवासी तरुणीचा मैत्रीपुर्ण संबंधातुन विनयभंग गुन्हा दाखल.

Featured जळगाव
Share This:

रत्नागिरी येथे पोलीस शिपाई म्हणुन नौकरीस असलेल्या आदीवासी तरुणीचा मैत्रीपुर्ण संबंधातुन विनयभंग गुन्हा दाखल.

यावल( सुरेश पाटील): तालुक्यातील चुंचाळे गांवातील राहणाऱ्या एका तरूणी गांवातीलच राहणाऱ्या एका तरूणाने मैत्रीपुर्ण संबध ठेवुन वारंवार त्या तरूणीचा आर्थिक व मानसिक छळ करून विनयभंग करून जातीवाचक बोलुन शिवीगाळ करून लज्जा वाटेल असे कृत केले म्हणुन यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील चुंचाळे येथे राहणारी २८वर्षीय तरूणी हे संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी पोलीस शिपाई म्हणुन कार्यरत असुन, गांवातीलच राहणारे शरद अशोक पाटील यांने फिर्यादी तरूणीशी २०१४ते१८/१/२०२१पर्यंत संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ते चुंचाळे गांवात मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापीत करून वारंवार फिर्यादी पोलीस शिपाई तरुणी कडील मोबाईल तपासणीसाठी मागतो या कारणावरून फिर्यादी तरूणीस शिवीगाळ,दमदाटी करून धमकी देवुन विनयभंग करून पैशांची मागणी करून मानसिक छ्ळ केला व फिर्यादी तरूणी ही आपल्या मुळ गांवी आली असता संशयीत आरोपी शरद अशोक पाटील यांने व इतर ५ते ७ जणांनी संगनमताने सदर तरूणी शेतात आपल्या आईचा जेवणाचा डबा घेवुन जात असतांना या सर्वांनी मिळवुन सदर तरूणीचे मैत्रीपुर्ण संबंधाचे वाईट वाटुन सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून मनाला लज्जा वाटेल असे कृत केले व यातील संशयीत आरोपी शरद पाटील यांने सदर तरूणीस रस्त्यावर एकटी गाठुन अंगलट येण्याचा प्रयत्न करून तरूणीचा मनास लज्जा वाटेत असे कृत करून विनयभंग केला म्हणुन तरुणीच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी शरद अशोक पाटील,कल्पना अशोक पाटील, आशा शरद पाटील,बायजाबाई पाटील पुर्णनांव माहीत नाही जनाबाई पाटील, पुनम स्वपनिल पाटील आणी स्वपनिल पाटील सर्व राहणार चुंचाळे तालुका यावल यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधिर पाटील,पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार हे करित आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *