जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित, एकूण 14 रूग्ण आढळले

Featured जळगाव
Share This:

जळगाव – जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल  प्राप्त झाले आहे.

यापैकी 14 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगाव शहरातील  दक्षता नगरातील तीन , तांबापुरातील एका, बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, ता. यावल येथील एक, शाहूनगर, जळगाव याप्रमाणे एकूण 14 व्यक्तींचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 482 इतकी झाली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *