यावल येथे अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी पथकाने पकडले

Featured जळगाव
Share This:

यावल येथे अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी पथकाने पकडले.

यावल शहरात अवैध वाळू वाहतुकीसाठी अनेक रस्ते.

यावल (सुरेश पाटील): यावल मंडळ अधिकारी पथकाने आज दि.19बुधवार रोजी भर दुपारी 15:30 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.
आज दुपारी यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर क्र.MH-19-BG-1602आढळून आल्याने मंडळ अधिकारी यावल, यावल तलाठी,चुंचाळे तलाठी, कोरपावली तलाठी,विरावली तलाठी, तसेच कोळवद येथील कोतवाल, विरावली येथील कोतवाल यांच्या पथकाने ट्रॅक्टर पकडून पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.
यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी शहराच्या चारही बाजूने ट्रॅक्टर आणि डंपर वाळू भरून सोयीनुसार पाहिजे त्या रस्त्याने ये जा करीत असतात यात प्रामुख्याने हडकाही खडकाई नदीपात्रातून तसेच अंजाळे,वड्री सातोद कोळवद,बोरावल भालशिव पिप्री,निमगाव परिसरातील नदी-नाल्यातून आणि तापी नदी पात्र परिसरातून अवैध गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात सर्रास वाहतूक होत आहे यात काही क्रशर उद्योगांच्या मार्फत सुद्धा अवैध गौण खनिज यावल शहरातून वाहतूक केली जाते, क्रशर उद्योजक तापी नदीपात्रातून किती ब्रास गौण खनिज उत्खनन करतात?आणि किती प्रमाणात (लाखो ब्रास) गौण खनिज विक्री करतात हे फक्त महसूल विभागालाच माहिती,एकट्या यावल शहरात 20ते 25अवैध वाळू वाहतूक आणि गौण खनिज वाहतूक करणारे व्यावसायिक आहेत यांच्या नावाची यादी वाहन क्रमांकसह अनेकांजवळ/हप्ते घेणाऱ्या जवळ आहे,अनेक जण विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा टिपले गेले आहेत, यांना वेळेचे कोणतेही बंधन नाही रात्री बेरात्री कोणत्याही वेळेस सुसाट वेगाने संपूर्ण यावल शहरात अवैध वाळू वाहतूकची वाहने धावत असतात यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाने दररोज कोणालाही माहिती पडू न देता गोपनीय पद्धतीने यावल शहराच्या चारही बाजूने वेगवेगळे भरारी पथक नियुक्त केल्यास वाहतूकदारांना काही प्रमाणात आळा बसेल काही वाळू वाहतूकदारांनी कारवाई होऊ नये म्हणून मोजक्या प्रतिनिधीसह आम्ही सर्वांना हप्ते देतो आणि तशी बदनामी सुद्धा यावल शहरात सुरू केलेली आहे,त्यामुळे महसूल पथकाने फक्त यावल शहरासाठी वेगवेगळे चार ते पाच पथक नियुक्त करून अवैध वाळू,अवैध गौण खनिज वाहतूकदारांना कायद्याची जाणीव करून द्यावी असे सुद्धा संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *